बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली, त्यांना लाजही वाटत नाही- प्रणिती शिंदे

सोलापूर | कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ताटं वाजवल्यामुळे आपल्या देशात अवदसा आली आहे. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्युला नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका केली आहे.

नरेंद्र मोदी माध्यमांसमोर यायला घाबरतात. एकदाही ते माध्यमांसमोर आले नाहीत. फक्त मतदानाच्या वेळी समोर येतात आणि मतदान मागतात, त्यांना लाजही वाटत नाही, असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. प्रणिती शिंदेंनी काँग्रेसला मतदान केलं तर भाजपला होत असल्याचा आरोपही केला आहे.

नरेंद्र मोदी यांचं भूत मतदान करण्याच्या मशिनमध्ये जाऊन बसलं आहे. कारण हाताला मतदान केलं तर ते भाजपला होतं. त्यामुळे आधीचं शिक्का मारून केलं जाणार मतदान हे योग्य होतं. ते मतदान बॅलेट पेपरवर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं शिंदे म्हणाल्या.

दरम्यान, प्रणिती शिंदेंनी केलेल्या टीकेवर भाजप काय प्रत्युत्तर देत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

नातीमुळं झाली विखे-मोदी भेट, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

राज कुंद्रासोबतचा ‘हा’ फोटो शेअर करत शर्लिन चोप्राने केला मोठा खुलासा; म्हणाली…

…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार!

मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय!

‘…त्या दिवशी पुन्हा कडक लॉकडाऊन करणार’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More