अहमदनगर | सोनईच्या ज्ञानेश्वर कॉलेजमध्ये ‘यशोरंग’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रशांत गडाख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीसह ‘रंग बरसे’ या गाण्यावर ताल धरल्याचं पाहायला मिळालं.
‘रंग बरसे’ या अमिताभ बच्चन यांच्या ‘कभी कभी’ चित्रपटातल्या गीतावर प्रशांत गडाख आणि त्यांच्या पत्नी गौरी यांनी अप्रतिम डान्स करत उपस्थितांना आश्चर्यचकीत केलं. यावेळी उपस्थित तरूण-तरूणींनी त्यांना टाळ्या आणि शिट्ट्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.
प्रशांत गडाख यांनी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या नृत्याचीच आठवण करून दिली. त्यांना त्यांची पत्नी गौरी यांनी देखील उत्तम साथ दिली. शिवाय शालेय विद्यार्थ्यांनीही त्यांच्यासोबत नृत्य केलं.
दरम्यान, आमदार प्रशांत गडाख आणि गौरी यांचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसंच त्यांच्या अप्रतिम नृत्याचं कौतुक देखील होत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय?; प्रेमी युगलाला मारहाण करत तरूणीचा विनयभंग
महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार- देवेंद्र फडणवीस
महत्वाच्या बातम्या-
अरे काय पाहिजे सांगा, मी द्यायलाच बसलोय- अजित पवार
“सगळे निर्णय अजित पवार घेतायत अन् मुख्यमंत्री गोट्या खेळतायत”
हिटलरने जे जर्मनीत केलं तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न; आव्हाडांचा घणाघाती आरोप
Comments are closed.