बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रवी राणांची आमदारकी जाणार?, रवी राणा म्हणतात…

अमरावती | बडनेरा विधासभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना राज्य निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. निवडणूक खर्चाचे योग्य स्पष्टीकरण न दिल्यामुळे ही नोटीस बजावली असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. त्यामुळे आमदार रवी राणा यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10-ए अंतर्गत अपात्र ठरविण्याची कारवाई लवकर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी निवडणूक आयोगाला दिले आहे. न्यायालयाची कुठलीही नोटीस आम्हाला अद्याप आलेली नाही, निवडणुकीत मी मर्यादित प्रमाणात खर्च केला होता, त्यामुळे न्यायालयात माझी बाजू मांडणार असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं आहे.

सुनील खराटे आणि सुनील भालेराव यांनी रवी राणा यांच्याविरोधात न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. त्यावर 8 ऑक्टोबर 2021 रोजी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10-ए अंतर्गत कारवाई करण्यासंदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहे. रवी राणा यांच्यावरील कारवाई 6 महिन्यात पूर्ण केली जाईल, असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि माजी खासदार अनंतराव अडसुळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती, त्यानंतर जून 2021 रोजी उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं, त्यामुळे आता नवनीत राणा यांच्यासोबत त्यांचे पती रवी राणा यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

बहुप्रतिक्षित IPO बाजारात धडकणार! ‘या’ कंपनीबाबत केंद्र सरकार लवकरच मोठी घोषणा करणार

“मी बिग बॅासमध्ये गेल्यामुळे काही लोकांपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचली”

वापरलेल्या मास्कची पायपुसणी, धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर महापालिकेची कारवाई!

“तृप्ती देसाई सुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या”

पिंपरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; रावण गँगमधील 4 जणांना केली अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More