बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदार रवी राणांच्या अडचणी वाढल्या; आमदारकी धोक्यात?

अमरावती | नेहमीच चर्चेत असणारे आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढल्याची चिन्ह दिसून येत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं स्पष्ट होतंय. यापुर्वीही रवी राणांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र न्यायालयाने रद्द केलं होतं.

रवी राणा यांनी विधानसभा निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याप्रकरणी लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम 10-ए अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी अशी नोटीस न्यायालयाने निवडणूक आयोगाला बजावली आहे. त्यामुळे याबाबत आता निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे.

सुनिल भालेराव आणि सुनिल खराटे यांनी रवी राणांनी अतिरीक्त खर्च केला असा आरोप करत याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना आता न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं आहे. तसेच संबंधित कारवाई येत्या 6 महिन्यात पुर्ण केली जाईल, असं न्यायालयाला आयोगाने सांगितलं आहे.

विधानसभा निवडणुकीत 28 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा असताना रवी राणा यांनी मागच्या निवडणुकीत तब्बल 41 लाख 88 हजार रुपये खर्च केल्याप्रकरणी त्यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणात त्यांची आमदारकी धोक्यात असल्याचंही बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘मुंबई क्रुझ प्रकरण पुर्णपणे खोटं, शाहरूख खान त्यांच्या निशाण्यावर’; शत्रुघ्न सिन्हा संतापले

“शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची सफरचंद चोरून खालली”

विराटचं स्वप्न भंगलं! रोमांचक सामन्यात कोलकाताचा बंगळुरूवर दणदणीत विजय

वाह छेत्री वाह! सुनिल छेत्रीने केली महान फुटबॉलपटू पेलेच्या व्रिकमाची बरोबरी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More