बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पवार साहेबांसारख्या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो! – रोहित पवार

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शरद पवार यांना होत असलेला पोटदुखीचा त्रास वाढल्यानं मंगळवारी रात्री त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर अनेक नेत्यांनी शरद पवारांची विचारपूस केली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळी शरद पवारांचा रूग्णालयातील फोटो शेअर केला होता. तर आता आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहली आहे.

‘ब्रीच कँडी’ हॉस्पिटलमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले. सर्वांनाच काळजी वाटत असली तरी साहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांना लवकर आराम मिळेल. शस्त्रक्रिया करणारे डॉ. मायदेव आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार!, अशी फेसबुक पोस्ट रोहित पवार यांनी लिहली आहे.

शस्त्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांसह आम्ही पवार साहेबांची भेट घेतली. टोपे साहेबांना पाहून पवार साहेबांनी त्यांच्याकडून इतर विषयांसह राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेतली. हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो!, असं रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पित्ताशयात असलेले खडे बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अमित मायदेव यांनी दिली होती. तर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन पवारांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात 80 टक्के कोरोनाबाधितांना लक्षणंच नाही

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप

1 एप्रिलपासून ‘या’ वयोगटापुढील व्यक्तींना मिळणार कोरोना लस, असा लावा नंबर!

“…तर सचिन तेंडूलकर, लक्ष्मण आणि गांगूली कधीच पास झाले नसते”

मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याला पोलिसांनी केली अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More