बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोहित पवारांना मंत्रिपद मिळणार का?, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | आगामी हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) आधी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिकामी आहे. त्यामुळे आता या जागी राष्ट्रवादी पक्षातील कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची संधी देणार? यासंदर्भातील चर्चांना वेग आला होता. मात्र आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिपद (MLA Rohit Pawar Likely To get Ministerial Post)  दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आता रोहित पवारांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळण्याची संधी आहे. मात्र, रोहित पवार यांना नेमकं कोणतं खातं मिळणार? याबाबत अजून काही ठोस माहिती मिळालेली नाही.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद देण्यात आले होते. त्यामुळे दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे आधी असलेले कामगार आणि उत्पादन शुल्क हे खातं रिकामं आहे. त्याचबरोबर कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याने अहमदनगरचे पालकमंत्रीपद घेण्यास हसन मुश्रिफ यांनी नकार दिला आहे. त्यामुळे या दोन्हीपैकी एका जागी रोहित पवारांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, रोहित पवार शरद पवाराचं वारसा पुढे चालवणार, असं बोललं जात आहे. त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात केलेल्या विकासकामांचे सर्वत्र कौतुक सुरु आहे. त्याचबरोबर रोहित पवारांनी राजकारणात स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांना यावेळी मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मिस यु आई’ म्हणत एअरपोर्टवर गेला अन् आईनी चपलेने धुतलं; पाहा मजेशीर व्हिडीओ

“अनिल परबांची तेवढी ताकद नाही, मंत्री म्हणून जी संविधानिक उंची लागते ती…”

“तेव्हा मला माझीच लाज वाटली, कोणीतरी कानाखाली मारल्यासारखं वाटलं”

Omicron मुळे तिसरी लाट येणार?, आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

चक्रीवादळाचा धोका! ‘या’ तीन राज्यांना अलर्ट जारी, रेल्वे गाड्या देखील रद्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More