Top News महाराष्ट्र मुंबई

“महाविकास आघाडीला मनात जागा देऊन जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली”

मुंबई | विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. निवडणुकाअगेदर भाजप नेत्यांनी सहाच्या सहा जागा भाजपच्या येतीस असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र भाजपला अवघ्या एका जागोवर समाधान मानावं लागलं आहे.

या निवडणुकीच्या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी मविआसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने मविआची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली, असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत इथं महाविकासआघाडीने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळं आतातरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नसल्याचं रोहित पवार म्हणाले.

 


महत्वाच्या बातम्या- 

“फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही”

“आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही”

“संयम, शिस्त दाखवली हल्लाबोल कुठे आणि कधी करायचा हे देखील आम्हाला माहीत आहे”

‘शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा’; सोलापुरच्या शिक्षकाचं तुकाराम मुंढेंकडून कौतुक

14-15 डिसेंबरला मुंबईत होणार हिवाळी आधिवेशन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या