…तर हा नेता महाविकास आघाडीच्या वळू- रेड्यांना चाबकाने फोडून काढणार

Maharashtra l राज्याच्या राजकारणात दररोजच आरोप- प्रत्यारोपाचं सत्र सुरु आहे. अशातच आज गलीच्या शिराळा येथील रयत क्रांती कार्यालयाच्या उद्घाटन पार पडलं. या उद्घाटनावेळी भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांनी कोंबड्यासारखं रोज बाग देणं बंद करावं आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे असं पत्र त्यांनी द्यावं असा टोला आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीच्या वळू-रेड्यांना चाबकाने फोडून काढणार :

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार व रोहित पवारांनी महाराष्ट्रात आग लावण्याचं काम बंद करावं. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वळू-रेड्यांना चाबकाने फोडून काढणार असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

तसेच दररोज एक घर कोंबडा आरोळी देतो. त्याच नाव संजय राऊत आहे. तर त्या कोंबड्याला मी सांगतो की, दररोज बाग देऊ नकोस खुरुड्यातनं. तसेच तू सध्या जरांगे पाटलांना एक पत्र लिहून दे की माझी उबाठा सेना मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला पाठिंबा देत आहे. तर अरे आपण बघूया कोंबड्या तुझ्यात जोर आहे का? असं आमदार सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

Maharashtra l शरद पवार व रोहित पवारांनी महाराष्ट्रात आग लावण्याचं काम बंद करावं :

यासंदर्भात आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचे काम सध्या शरद पवार करत आहेत. त्यामुळे हे वेळीच मराठा समाजाने ओळखलं पाहिजे. तसेच सगळं दिल्यानंतर देखील ते राज्यामध्ये व मराठा समाजामध्ये दुही माजवण्याचे काम जोराने करत आहेत. त्यामुळे मी अनेक वेळा वक्तव्य केलं आहे, जी माणसं महाविकास आघाडीमधून निवडून आले आहेत त्यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहावं.

जसं की, जरांगे पाटलांना मी खासदार अमुक अमुक लिहून देतो की, मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करायला माझा पाठिंबा देत आहे. तसेच आमदार रोहित पवार हे विद्वान माणूस आहेत, त्यामुळे ते महाराष्ट्रात आग लावत आहेत. भाडोत्री सोशल मीडिया महाराष्ट्रात तुम्ही ठेवला आहे. त्यामुळे आग लावायचे धंदे बंद करा असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

News Title- MLA Sadabhau Khot Aginst Statement On Mahavikas Aaghadi

महत्वाच्या बातम्या-

पुणे हादरलं! भररस्त्यात गोळीबार अन् पुढे घडल भयंकर

राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस; ‘या’ आमदाराची जीभ घसरली

शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय, ‘या’ नेत्याची जहरी टीका

स्वित्झर्लंड विसरा, हनीमूनसाठी बेस्ट आहेत भारतातील ‘ही’ 4 ठिकाणं!

राज्य सरकार धनगर, धनगड संदर्भात मोठा निर्णय घेणार! आता यापुढे…