बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मतदानादरम्यान मजुरांना गावी परतण्याची सोय करता, आपत्ती काळात विरोध कशाला- सदाभाऊ खोत

पुणे | निवडणुकीत मतदानासाठी कामगारांना गावात आणण्यात सर्वच राजकीय पक्ष पुढे असतात. हे कामगार तुमचा जयजयकार करण्यासाठी चालतात. मग अशा आपत्तीच्या काळात या मजुरांना त्यांच्या गावात विरोध का करता, असा सवाल  रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अडकलेल्या राज्यातील मजुरांसाठी सदाभाऊ खोत आक्रमक पावित्रा धारण केला आहे. या मजुरांना गावात प्रवेश देण्यास विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही त्यांनी समाचार घेतला.

मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरातील मजुरांना गावी परतण्याची सोय सरकारनं त्वरित करावी, अशा सूचनाही सदाभाऊ खोत यांनी केल्या आहेत.

आम्ही या कामगारांना, मजुरांना वाऱ्यावर सोडणार नाही. यासाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी. अन्यथा आंदोलन करु, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही- पृथ्वीराज चव्हाण

अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड

महत्वाच्या बातम्या-

मोदीजी, शेतकरी जगला पाहिजे…. शेतकऱ्याला वाचवा; पवारांची पत्रातून आर्त साद

हे आघाडीचं सरकार आहे की वाधवान सरकार??; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

दिलदार रिक्षावाला! लग्नासाठी जमवलेली रक्कम मजूरांच्या जेवणासाठी करतोय खर्च

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More