राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदारासह 52 नगरसेवक भाजपमध्ये जाणार??

नवी मुंबई | राष्ट्रवादीचे एरोली मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक भाजपत जाणार असून त्यांच्यासोबत नवी मुंबई महापालिकेतले 52 नगरसेवकही भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा  आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक शरद पवारांचे विश्वासू असल्याचं बोललं जात आहे. पण संदीप यांचं न ऐकल्यास वडीलांचा विरोध झुगारून ते  भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

आज(रविवार) झालेल्या बैठकीत माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर पक्ष सोडण्यासाठी नगरसेवकांकडून दबाव आणला जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बडे मंत्री, आमदार सातत्याने काँग्रेस- राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपत जात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“काँग्रेस-राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात”

-“लोकसभा तो सिर्फ झाँकी थी, विधानसभा की पुरी पिक्चर अभी बाकी हैं”

-शरद पवारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणतात…

-‘हा’ माजी आमदार म्हणतो… मी शिवसेनेकडून निवडणूक लढवणारच!