बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदार असावा तर असा! रस्त्यावर पडलेलं झाड बाजूला करण्यासाठी काढलं शर्ट अन्…; पाहा व्हिडीओ

बुलडाणा | 28 मेला रात्री बुलडाणा मतदार संघात भागात वादळी वाऱ्यासह वादळामुळे पाऊस पडला. यामध्ये अनेक झाडं पडली आणि नुकसानही झालं. या पाहणीसाठी शिवसेनेेचे आमदार संजय गायकवाड गेले होते. त्यावेळी वाटेत त्यांना एक झाड पडलेलं दिसलं. झाड पडलेलं म्हटल्यावर गायकवाड यांनी सरकारी यंत्रणेला न सांगता स्वत: झाड बाजूला केलं. संजय गायकवाड यांनी याबाबतच व्हिडीओ आपल्या फेसबुकवर पोस्ट केला आहे.

संजय गायकवाड यांचा झाड बाजूल करतानचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी गायकवड यांनी झाड बाजूला केलं त्यादिवशी त्यांचा वाढदिवस होता. गुळभेली ते राहेरा मार्गाने जात असताना एक झाड त्यांना रस्त्यात पडलेले दिसले. त्यावेळी त्यांनी शर्ट काढून सहकाऱ्यांच्या मदतीने झाड बाजुला केलं.

संजय गायकवाड यांच्या झाड हटवण्याच्या कृतीवरून त्यांनी सर्व आमदारांना एक आदर्श घालून दिला आहे. आमदाराने फक्त सह्याच नाहीतर अशा प्रकारे रस्त्यावर उतरून काही समाजपयोग काम केलं तर जनतेला आपल्या लोकप्रतिनिधीबद्दल आपुलकी वाटते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपुर्वी संजय गायकवाड यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी त्यांनाही टीकेचा सामना करावा लागला होता.

https://fb.watch/5Qwthn5_r2/

 

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! विमान अपघातात ‘टार्झन’ अभिनेता जो लारासह सात जणांचा मृत्यू

सिल्व्हर ओकवर फडणवीस-पवार भेटीने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

ऐकावं ते नवलच! चक्क कुत्रा करतोय डोंबाऱ्याचा खेळ, पाहा व्हायरल व्हिडीओ

गुजरातला 1 हजार कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या- अजित पवार

कोरोनामुक्त झालेल्या माय-लेकीचा पाठलाग करत आईवर गँगरेप, मुलगी वाचली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More