प्रति, उद्धव ठाकरे, पत्रास कारण की… संजय शिरसाट यांचं स्फोटक पत्र
गुवाहाटी | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरु आहे. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी भावनिक भाषण करुन वर्षा निवासस्थान सोडलं, त्यानंतरही शिंदे गट माघार घेण्यास तयार नाहीत, उलट शिवसेनेच्या उरलेल्या आमदारांपैकी काही आमदार शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने तो अधिक बळकट झाला आहे. अशा परिस्थितीत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी एक स्फोटक पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
संजय शिरसाट यांनी लिहिलेल्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे-
-आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करुन हे पत्र लिहितोय.
-काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी उघडली, तेथे झालेली गर्दी पाहून आनंद झाला, ही दारं गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना आमदारांसाठी बंद होती.
-वर्षा बंगल्यावर प्रवेश करण्यासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, राज्यसभेत तसेच विधानपरिषदेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करावी लागत होती.
-मतदारसंघातील प्रश्नांसाठी फार विनवणी केल्यावर हे बडवे आम्हाला वर्षावर बोलवायचे, मात्र बंगल्याच्या गेटवरच आम्हाला तासनतास उभं ठेवलं जायचं. बडव्यांना फोन केले तर ते फोन उचलत नसत, शेवटी आम्हाला कंटाळून मागं जावं लागायचं. तीन ते चार लाख लोकांमधून निवडून येणाऱ्या आम्हाला अशी अपमानास्पद वागणूक का?
-आम्हाला तुमची दारं खुली नव्हती तेव्हा एकनाथ शिंदेंची दारं आमच्यासाठी खुली होती. ते आमची गाऱ्हाणी ऐकायचे त्यावर मार्ग काढायचे. त्यामुळे आम्हा सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हा निर्णय घ्यायला लावला.
-हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे सर्व मुद्दे शिवसेनेचे आहेत ना?, मग आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला का जावू दिलं नाही. विमानात बसण्याच्या तयारीत असलेल्या आम्हाला तुमच्या एका निरोपामुळे घरी जावं लागलं. आम्हाला रामलल्लाचं दर्शना का घेऊ दिलं नाही?
-आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते. मतदारसंघातील कामं करत होते. निधीचं पत्रं नाचवत होते. तुमच्यासोबतचे फोटो व्हायरल करत होते. लोक आम्हाला विचारायचे त्यांना भेटणारे मुख्यमंत्री तुम्हाला का भेटत नाहीत. यावर काय उत्तर द्यायचं यानं जीव कासावीस व्हायचा.
-आम्हाला शिंदे साहेबांनी मोलाची साथ दिली, कठीण प्रसंगात त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी खुले होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत.
-काल तुम्ही बोललात त्यात खूप भावनिक होतं, पण आमच्या प्रश्नांची उत्तरं कुठंच नव्हती. त्यामुळे हे पत्र तुम्हाला लिहावं लागतंय.
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वर्षा बंगला सोडायला लावणाऱ्यांना माफ करणार नाही”
“हे खरं आहे का?”, शिंदे-भाजप युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मोठी खळबळ
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल माझ्या मनात आणखी आदर वाढला”
“आमचा विठ्ठल चांगला आहे, त्यांच्या अवतीभवती असलेल्या चारपाच बडव्यांनी त्याला घेरलंय”
Comments are closed.