‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही’; बंडखोर आमदाराने उद्धव ठाकरेंना सुनावलं
मुंबई | शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची एक विशेष मुलाखत सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतली. त्या मुलाखतीत त्यांनी बऱ्याच गोष्टींवर भाष्य केले आणि अनेक गौप्यस्फोट देखील केले. उद्धव ठाकरे म्हणाले, आधी पक्ष पळवला आणि आता माझे वडिल बाळासाहेब ठाकरे यांना पळवत आहेत. त्यांनी त्यांच्या आईवडिलांचे फोटो लावून मते मागावीत.
त्यावर आता शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या आव्हानावर उत्तर दिलं आहे. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख ही काय तुमची खासगी मालमत्ता नाही. ते प्रत्येक शिवसैनिकांचे दैवत आहे. त्यांचा फोटो लावण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव सभांमध्ये घेतलं जातं. त्यामुळे तुम्ही त्यांना आणि त्या ऊंचीच्या नेत्याला एवढे खुजे करु नका, असा इशारा संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरे यांना दिला. बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईमुळे आम्ही घडलो आहोत. तुम्ही त्यांना एवढे छोटे करण्याचा प्रयत्न करु नका, असंही शिरसाट म्हणाले.
दरम्यान, आजच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा आणि नेत्यांचा उल्लेख पालापाचोळा म्हणून केला आहे. त्यांनी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न वापरता निवडून येण्याचं आव्हान केलं आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शिरसाट म्हणाले, “पाने गळालीत त्यांचा अपमान करु नका, आज आम्ही पहात आहोत, मनोहर जोशी (Manohar Joshi) , लिलाधर ढाके (Liladhar Dake) तुमच्याबरोबर बसलेले दिसत नाहीत. काळाबरोबर सारे बदलत जाते. नव्याचे स्वागत करा.”
थोडक्यात बातम्या –
“साहेब जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले”
संसदेबाहेरील काँग्रेसच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची टीका, म्हणाले…
नक्की कुठे चुकलं?, उद्धव ठाकरे म्हणाले ‘गुन्हा माझाय, चूक माझी आहे’
“मी बरा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले, तेच पक्ष बुडवायला निघालेत”
काळजी घ्या! ‘या’ लोकांना मंकीपॉक्सचा सर्वात जास्त धोका, महत्त्वाची माहिती समोर
Comments are closed.