बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंडखोर आमदार संतोष बांगर म्हणाले ‘गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा’

मुंबई | आमदार संतोष बांगरे हे एकनाथ शिंदेच्या गटात गेले. त्यामुळे त्यानंतर पक्षाकडून कारवाई करत संतोष बांगर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख (District Head) पदावरुन हटवण्यात आलं. त्यानंतर बांगर यांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर शक्तीप्रदर्शन केलं. एकनाथ शिंदेनी ठाकरेंचा आदेशच बदलला. यानंतर त्यांनी आज हिंगोलीत शिवसेनिकांशी सवांद साधला.

हिंगोलीत बोलताना ते म्हणाले मला शिवसैनिकांना एकच सांगायचं आहे. आपण शिवसैनिक आहोत. जे कोणी आपल्याला गद्दार म्हणत असेल तर त्यांच्या काऩाखाली आवाज काढा असा आदेशच त्यांनी कार्यर्त्यांना दिला. आमदार संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल.

आम्ही भिणारे शिवसैनिक नाही. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला कोणी का रे म्हणलं, तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असंही ते पुढे म्हणाले. सध्या बांगर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

येत्या 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) होणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा ते बारा मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. यात बांगर यांना मंत्रिपद मिळावं अशी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. असं ते म्हणाले. तसेत जर मंत्रीपद मिळालं तर दहा हत्तीच बळ आपल्या अंगात येईल असं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

“संजय राऊत बावचळले आहेत, म्हणून ते…”; भाजप नेत्याची राऊतांवर बोचरी टीका

“केंद्राकडून लोकशाहीचे पंखच नाही तर पायही छाटण्याचा प्रयत्न”

सुष्मिता सेन-ललीत मोदींच्या अफेरवर राखीची प्रतिक्रिया; नरेंद्र मोदींना केला हा सवाल

“राज्याच्या राजकारणात एक दुजे के लिए सिनेमा सुरु”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More