बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महागाईचं भांडवल करून सत्तेत आलेल्यांना सामान्य जनतेचा कळवळा उरला नाही”

मुंबई | खाद्यतेल, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरी पार करण्याच्या तयारीत आहेत. देशातील काही शहरात इंधनाने शतक ठोकलं आहे. मागील वर्षभरात तेलाच्या किंमतीत 40 ते 50 रूपयांची वाढ झाली आहे. तर जीवनावश्यक गोष्टीचे देखील भाव वाढलेले दिसत आहे. त्यावरून आता मोदी सरकारवर कडाडून टीका होताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.

पेट्रोल-डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत, आधीच कोरोनाने पिचलेला सामान्य वर्ग आणि त्यात गॅस व खाद्यतेलाच्या या महागाईने तर सामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. ‘महागाई’ मुद्द्याचे भांडवल करून सत्तेत आलेल्या केंद्र सरकारला आता सामान्य जनतेचा कळवळा उरलेला दिसत नाही, अशी टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

खाद्यतेलासारखी मौल्यवान वस्तू स्वस्तात घेऊन गोरगरीब जनता पोट भरत होती. तेलाचा हा अपमान मोदीजींना सहन झाला नाही. वर्षभरात खाद्यतेलाचे दर दुप्पट करून मोदीजींनी तेलाला योग्य तो न्याय दिला याबद्दल त्यांचे आभार, अशी टीका राष्ट्रवादी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली होती.

दरम्यान, कोरोना संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यानंतर देखील जीवनावश्यक गोष्टीत भाववाढ केल्यानं काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. सत्तेत येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी महागाईचा आधार घेतला होता, त्यांनीच आता महागाई वाढवली आहे, अशी टीका देखील विरोधक करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

मोहम्मद सिराज हा जसप्रीत बुमराहला सर्वोत्तम पर्याय’; भारतीय संघाच्या ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

एका पत्रकाराला अटक करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी थेट विमानाचं केलं अपहरण, वाचा संपुर्ण प्रकरण

‘राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू’; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

प्रेम केल्याची जीवघेणी शिक्षा, कोल्हापुरात प्रेयसीच्या वडिलांच्या भितीने युवकाची आत्महत्या

PNB घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी 3 दिवसांपासून गायब; पोलिसांचा तपास सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More