बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मराठे कधी पाठीमागून वार करत नाहीत,समोरून वार करतात’; आमदार शशिकांत शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया

सातारा | साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनावर गुरुवारी सकाळी काही लोकांनी दगडफेक केली होती. मराठ्यांना आरक्षण देण्यास सरकार अपुरं पडल्यानं ही दगडफेक करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. या घडलेल्या दगडफेकीच्या घटनेचा आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत निषेध केला आहे. ‘मराठे कधी पाठीमागून वार करत नाहीत, समोरून वार करतात’ अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिली आहे.

मराठा समाजाच्या कालच्या आणि उद्याचा लढ्यात आम्ही सहभागी असू पण एकाच पक्षाला कोणी टार्गेट करणार असेल, तरी आम्ही देखील त्याच पद्धतीने उत्तर देऊ. असा प्रकार करणाऱ्यांना पोलिसांनी 24 तासांत अटक करावी. हा प्रकार कोणी घडवून आणला? त्याच्या हेतूचा शोध लागला पाहिजे, असं आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. याचिकाकर्ते सदावर्ते त्यांनी सातत्याने शरद पवार, सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. जर याचिकाकर्ते आमचे असते तर त्यांनी अशी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नसती, असं देखील शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीची भूमिका या समाजाच्या कायम पाठीशी राहणारीच आहे. शांतता भंग करण्याचे काम कोणी करत असेल तर राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

संगमनेरमध्ये जमावाचा पोलिसांच्या गस्त पथकावर हल्ला ; पाहा व्हिडीओ

“दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता?”

सोने-चांदीच्या किंमतीत मोठी दरवाढ; जाणून घ्या नवे दर

“अशोक चव्हाण यांना कायदा कळत नाही, वेड पांघरून पेडगावला जात आहे”

मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याकडून ‘ही’ खुशखबर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More