बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपलं घराणं कुठलं, करताय काय?” शिवेंद्रराजेंचा उद्यनराजेंना खोचक टोला

सातारा |  खासदार उद्यनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील वाद जगजाहीर आहे. एकाच पक्षात असूनही हे दोघं एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र आता शिवेंद्रराजे यांनी उद्यनराजेंवर केलेल्या टीकेमुळे या दोघांमधील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. शिवेंद्रराजेंनी उद्यनराजेंना थेट त्यांच्या घराण्याची आठवण करून देत आपलं घराणं कुठलं, करताय काय? असा खोचक सवाल विचारला आहे. त्यामुळे या दोघांमधील संघर्ष समोर आला आहे.

राज्यात आगामी काळात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयार करताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्यनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात हा वाद पेटल्याचं समोर आलंय. यादरम्यान शिवेंद्रराजे यांनी उद्यनराजेंना दुचाकी चालविण्यावरून, पोस्टरबाजीवरून आणि रामराजे यांची भेट घेतल्याच्या मु्द्दयांवरून चांगलंच सुनावलं आहे.

उद्यनराजे यांनी सातारा सर्किट हाऊसवर रामराजे यांची भेट घेतली होती. यावर शिवेंद्रराजे यांनी उद्यनराजेंवर टिका केली आहे. ते म्हणाले “ज्या रामराजेंना दाखवतो आणि बघतो ची भाषा केली. त्यांच्याशीच चर्चा करायला कशाला जायचं. आपलं घराणं कुठलं? करताय काय? छत्रपतीचं घराणं आहे. असा खोचक सवाल त्यांनी यावेळी विचारला आहे. शिवेंद्रराजेंनी केलेल्या या टीकेमुळे हा वाद आता आणखी वाढणार असं दिसतंय.

याशिवाय उदयनराजेंनी केलेल्या पोस्टरबाजी आणि दुचाकी चालवण्याचाही शिवेंद्रराजेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. उद्यनराजेंनी  दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्ष सातारची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टरबाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा सातारच्या विकास कामांवर खर्च केला असता, तर बरं झालं असतं. नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने उदयनराजेंची ही नौटंकी सुरू असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

या अभिनेत्याला ओळखलत का? याआधी न्युड फोटोशुटमुळे आला होता चर्चेत

‘मी तुमच्यासाठी कपडे घालत नाही’, ट्रोलर्सवर भडकली ‘ही’ अभिनेत्री

महिन्याभरात सीएनजी गॅसचे दर दुसऱ्यांदा भडकले, जाणून घ्या नवे दर

पेट्रोलियम कंपन्यांचा सर्वसामान्यांना सलग दुसऱ्या दिवशी दिलासा!

सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईतुन मोठा दिलासा; वाचा सविस्तर वृत्त

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More