गोंदिया महाराष्ट्र

मध्यरात्री सलून उघडायला लावून केली कटींग; भाजप खासदाराचा प्रताप

भंडारा | कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानांना ठराविक वेळ निर्धारित करून देण्यात आली आहे. मात्र भाजपच्या एका खासदारानंच लाॅकडाऊनच्या नियमांची पायमल्ली केल्याचा प्रताप समोर आला आहे. कटींग करण्यासाठी म्हणून खासदारानं चक्क रात्रीच्या सुमारास सलून उघडं करायला दुकानदाराला भाग पाडल्याची माहिती आहे.

भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांचा सोशल मीडियावरील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कटिंग करण्यासाठी मेंढे रात्रीच्या सुमारास सलूनमध्ये गे्ल्याचं पहायला मिळत आहेत. लाॅकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून रात्री 11 वाजता सलून सुरू करण्यात आलं. यामुळे सामान्य नागरिकांना अन् नेतेमंडळींना वेगळा कायदा आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील लुक्स सलूनचे शटर रात्री 11 वाजता उघडे असल्याचं काही स्थानिकांच्या लक्षात आलं. तसेच खासदार सुनील मेंढे यांची गाडी आणि त्यांचा गार्ड देखील दुकानाबाहेर उभे असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. यापैकी काही नागरिकांनी मेंढे यांचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गार्डने या नागरिकांची अडवणूक केली.

यावर संतापून एका नागरिकानं रात्री अकरानंतर कुठल्या कायद्यात दुकान सुरू आहे. असा जाब विचारला असता गार्डनं मला विचारू नका साहेबांना विचारा, असं सांगत तोंड वळवलं. यानंतर व्हिडीओ काढणं बंद झाल्यावर मेंढे यांनी सलूनमधून तातडीनं पळ काढला. मात्र घडलेल्या प्रकारानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“ज्यांचं नाव वापरून सत्तेत आलात त्यांचा हाच पुतळा तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही”

बारामतीत ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी…., अजितदादांच्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना

प्रवीण दरेकर यांचा मुंबई महानगरपालिकेवर गंभीर आरोप, म्हणाले…

अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या