मुंबई | जाहीर मंचावरून अनेक नेतेमंडळी अनेकदा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदाराला विधानसभेतच रडू कोसळलं. पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांविषयी बोलताना राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या डोळ्यात पाणी आलं.
पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील विषयावर आमदार शेळके यांनी लक्षवेधी लावली होती. मात्र, ती लागत नसल्याने शेळके नाराज झाले. जर या शेतकऱ्यांचा विषय घेतला नाही तर 2011 सालच्या प्रकरणाची पुनरावृत्ती होईल. त्यावेळीही याच विषयावरून आंदोलन झालं होतं, अशी भीती आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली.
तर शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) भेट घेतल्याचंही सांगितलं. अजित पवारांनी मीटिंग लावण्याचं आश्वासन दिलं आहे. तर विधानसभेत देखील मला मीटिंग लावण्याचं आश्वासन मिळालं आहे, अशी माहिती देखील आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत बोलताना दिली.
दरम्यान, त्यांना हा विषय मार्गी लावावाच लागेल. अन्यथा लढा उभारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील सुनील शेळके यांनी दिला आहे. तर आमदारांना घर देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) निर्णयाचं देखील सुनील शेळके यांनी स्वागत केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?”
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ; वाचा ताजे दर
“देवेंद्र फडणवीस झोपेतही बडबडतात अन् बेडवरून खाली पडतात”
“The Kashmir Files टॅक्स फ्री करण्यापेक्षा Youtube वर टाका”
मोठी बातमी! PM Kisan योजनेत सरकारने केला ‘हा’ मोठा बदल
Comments are closed.