Top News पुणे महाराष्ट्र

आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी; टिंगरे, म्हणे तो मी नव्हेच!

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांच्या नावाने पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांना आणि बड्या ठेकेदारांना फोनवरुन धमकी देत पैसे उकाळण्याचा प्रकार समोर आला आहे. सुनिल टिंगरे यांनी हा आरोप फेटाळला आहे. त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे याविरोधात तक्रार केली आहे.

माझ्या नावाने पैसे उकाळून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचं टिंगरे यांनी पोलिसांना सांगितलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या व्यवस्थापकाला 8070981333 या नंबरवरुन फोन आला. हा नंबर ट्रूकॉलरवर एमएलए सुनिल टिंगरे या नावाने दाखवला जात आहे.

आमदाराचा नंबर दाखवल्यानं व्यवस्थापकाने फोन उचलला. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने टिंगरेंच्या कार्यालयातून बोलत असून 50 हजार रुपये रोख कार्यालयात पाठवून द्या असं बजावण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर ठेकेदारांनाही खंडणी मागण्याचा प्रकार समोर आलाय.

दरम्यान, याच नंबरवरुन पुण्यातील रस्त्याचे काम करणाऱ्या बड्या ठेकेदारांनाही फोन केल्याचं उघडकीस आलं आहे. ठेकेदारांना 38 शिलाई मशीन तातडीने पाठवण्याची धमकी दिली. ठेकेदारांनी 38 शिलाई मशीन टिंगरेंच्या कार्यालयात पाठवल्या. फोन नक्की कोणी केला?, याचा तपास पोलीस करत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

पेस्ट कंट्रोलनंतर खबरदारी न घेणं जिवावर बेतलं; पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू

“उद्धवजी, राष्ट्रपुरूषांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा”

महत्वाच्या बातम्या-

कोणी जेलमध्ये टाकायची भाषा केली तर पवार साहेबांना आठवा- रोहित पवार

शिवरायांचा पुतळा हटवला तिथंच आता स्मारक; मुख्यमंत्री कमलनाथ करणार भूमिपूजन

शरद पवार आणि शिवसेनेनं भाजपला खिजवण्याचं काम करू नये- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या