‘कोणत्या दुनियेत आहात धनूभाऊ?, काही सिरीयसनेस…’, सरपंच हत्येवर आमदार धस संतापले

Beed News

Suresh Dhas | बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. यावरून महायुतीला विरोधक धारेवर धरत आहेत. रोज या प्रकरणी नवीन-नवीन खुलासे समोर येत आहेत. अशात आमदार सुरेश धस (Suresh Dhas ) यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी सरपंच हत्येवरून मुंडे यांच्यावर संताप व्यक्त केलाय.

“संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता. त्यामुळे मी या प्रकरणात जास्त सहभागी आहे. धनंजय मुंडे तुम्ही देशमुख यांच्या खून प्रकरणात समर्थन देत आहात का? कोणत्या दुनियेत वागताय धनुभाऊ?, तुमची स्टाईल कशी आहे धनु भाऊ? तुम्हाला सिरियसनेस आहे की नाही?”, असा संतापजनक सवाल सुरेश धस यांनी केला.

आमदार सुरेश धस काय म्हणाले?

पुढे बोलताना धस म्हणाले की, संतोष देशमुख यांची हत्या ही एक अमानवी घटना आहे. मी न्यायालयाचे आभार मानतो. आरोपींना 15 दिवसांचा पीसीआर (PCR) मिळाला ही समाधानाची बाब आहे.सीआयडी अधिकाऱ्यांना तपास करण्यासाठी गती मिळेल. आयजी लेवलचे अधिकारी, ज्युडिशिअल तपासणी होणार यासाठी मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतले असल्याचं आमदार धस (Suresh Dhas ) म्हणाले.

“हा रोष एकट्या बीड जिल्ह्यात नाही, तर राज्यभरात लोकांच्या मनात आहे. कोणाला ही घटना पटलेली नाही. मला वाटतं काल सर्वपक्षीय बैठक सुद्धा बीडला झाली आहे. काही निर्णय झालेत. बीड जिल्हा एकवटेल असं चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी हे सगळं मनावर घेतलंय”, असंही पुढे बोलताना आमदार धस म्हणाले.

बीडच्या आकाबद्दल मोठा खुलासा

“बीड जिल्ह्यात कायदा राहिला नाही. कायदा-सुव्यस्था आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर सुरू आहे”, असा आरोप देखील धस यांनी केला. यावेळी त्यांनी बीडच्या आकाबद्दल देखील मोठा खुलासा केला. आरोपी विष्णू चाटे हा आकाच्या खालचा छोटे आका आहे. पोलिसांनी पकडलं असं वाटत नाही, ते स्वत: सरेंडर झाले आहेत. यातला आका लवकरात लवकर आत गेला पाहिजे, अशी मागणी धस यांनी केलीये.

यावेळी बीडच्या पालकमंत्रीपदाबाबतही धस यांनी भाष्य केलं. “बीडचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारावा. अजित पवार जरी झाले तरी माझी हरकत नाही” असं सुरेश धस (Suresh Dhas ) म्हणाले. तसंच, हे दोघे पालकमंत्री होतील असे मला वाटत नाही असंही पुढे धस म्हणाले.

News Title –  MLA Suresh Dhas target Dhananjay Munde

महत्त्वाच्या बातम्या-

गुड न्यूज! लाडक्या बहीणींनो आजपासून खात्यात जमा होणार पैसे, 1500 की 2100 मिळणार?

प्रसिद्ध गायकाच्या बिल्डिंगला भीषण आग, मोठी जीवितहानी…

‘मुलांना सांता नाही संत बनवा’, नितेश राणेंचं ट्वीट चर्चेत

“तुझाही संतोष देशमुख केला जाईल”; सत्ताधारी आमदाराच्या पुतण्यांना थेट धमकी

मुंडेंना पक्षातूनच मोठा धक्का, राष्ट्रवादीचा नेता अजित पवारांना म्हणाला ‘बंदोबस्त करून…’

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .