खळबळजनक! पुण्यात भाजप आमदाराच्या मामाचं भर चौकातून अपहरण

Pune Crime

Pune Crime l सध्या पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अशातच आज पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं भर चौकातून अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र आता या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकं काय घडलं? :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिष वाघ यांचे शेवाळवाडीतून अपहरण करण्यात आले आहे. यावेळी एक चारचाकी गाडीतून आलेल्या चार अज्ञातांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सतीश वाघ यांचा शोध घेत आहेत.

आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सतीश वाघ हे सोलापूर रस्त्यावर असलेल्या ब्ल्यू बेरी हॉटेल बाहेर थांबले होते. मात्र यावेळी भरधाव वेगाने शेवरलेट एन्जॉय ही गाडी आली. त्यावेळी या गाडीतून दोन जण बाहेर आले. त्यांनी सुरवातीला सतीश वाघ यांच्यासोबत बातचित करण्याचं नाटक केलं. त्यानंतर दोन अज्ञातांनी बळजबरी सतीश वाघ यांना गाडीत बसवलं. यानंतर ते सतीश वाघ यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले.

Pune Crime l पोलीस तपास करत आहेत :

या संपूर्ण घटनेनंतर त्यांच्या मुलाने शोधाशोध देखील केली. परंतु, वडील मिळत नसल्याने त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरात शोधाशोध केली जात आहे. तसेच ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.

मात्र या घटनेतील आरोपी नेमके कोण होते? तसेच त्यांचा सतीश वाघ यांचं अपहरण करण्यामागे नेमका उद्देश काय होता? याशिवाय या चारही अज्ञातांनी सतीश वाघ यांचं अपहरण नेमकं का केलं? या गोष्टींचा तपास हडपसर पोलीस करत आहेत.

News Title : mla yogesh tilekar maternal uncle satish wagh kidnap in pune

महत्वाच्या बातम्या –

प्रियांका गांधींनी राजीनामा द्यावा; भाजप नेत्यानी केली मागणी

राज ठाकरेंनी सरकारकडे केली पहिली मागणी; काय आहे मागणी?

“शारीरिक दुखापत करत त्याने मला…”, ऐश्वर्या रायच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं!

“…आपलाच करेक्ट कार्यक्रम झालाय”; अजितदादांची मविआवर तूफान फटकेबाजी

शिंदे गटाला राष्ट्रवादीपेक्षा जास्त खाती मिळणार?, मोठी माहिती समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .