Mla Nitin Deshmukh | अकोला येथून अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर सराईत गुन्हेगारांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
अकोला शहरातल्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. पृथ्वी देशमुख हा कपड्याच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर या हल्लादरम्यान पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण झाली.
नितीन देशमुखांच्या मुलावर प्राणघातक हल्ला
या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) आणि शिवसैनिक पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
माझा मुलगा आहे म्हणून प्रश्न नाही तर या शहरातला कोणताच मुलगा आणि मुलगी सुरक्षित नाही. आम्ही याबाबत वारंवार एसपींना कल्पना दिली आहे. काही दिवसांपूर्वी 15 वर्षाच्या तरुण विद्यार्थ्याची कारण नसताना हत्या झाली होती. तो जेवणाचा डब्बा घेऊन चालला होता. दोन मुले वाढदिवस साजरी करत होते, त्या तरुणावर चाकूचा हल्ला झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. असे अनेक हल्ले होत आहेत, असं नितीन देशमुखांनी सांगितलं.
जवाहरनगरमध्ये अक्षरश: चाकू लावून खंडणी घेतली जाते, असाच प्रकार माझ्या मुलासोबत झाला. त्याला शिवीगाळ केली. नंतर खंडणी मागितली. ती दिली नाही म्हणून आठ ते दहा जणांनी मिळून मारहाण केली, असं नितीन देशमुखांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
एमसी स्टॅनबाबत धक्कादायक बातमी समोर, ‘त्या’ पोस्टने एकच खळबळ
लाडक्या बहिणींनो! तुमची प्रतिक्षा संपली, पाहा तिसरा हप्ता आला की नाही?
‘या’ राशींना येणार सोन्याचे दिवस, अचानक धनलाभ होऊ शकतो
‘…तर मी सरकारमधून बाहेर पडेन’; ‘या’ बड्या नेत्याची धमकी
शरद पवारांनी सांगितली रणनीती, उमेदवार ठरवण्याचा अधिकार फक्त ‘त्या’ तिघांना