गुवाहाटी | देशात सध्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणूका लागल्या आहेत. भाजप आणि काँग्रेस या निवडणुकांसाठी पुर्ण जोर लावताना दिसत आहे. यातच आसामच्या निवडणुकीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आसाममधील भाजपच्या आमदाराच्या गाडीत चक्क इलेक्ट्राॅनिक वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
रात्रीच्यावेळी स्थानिक लोकांनी आमदाराची गाडी आडवली होती. त्यावेळी त्याच गाडीत स्थानिक मतदान अधिकारी बसले होते. संतप्त स्थानिकांनी अधिकाऱ्याला बाहेर काढलं. गाडीची मागची बाजू उघडली, तेव्हा त्यात चक्क ईव्हीएम मशीन सापडलं. या प्रकरणात निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत कारवाई केली आहे. भाजपच्या या आमदाराचं नाव क्रिशनेन्दू पाॅल आहे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मतदान अधिकाऱ्याची कार बिघडल्याने, या अधिकाऱ्याने आमदाराला लिफ्ट मागितली. आमदारांनीही या अधिकाऱ्याला लिफ्ट दिली, अशी माहिती निवडणूक आयोगाला मिळाली आहे. स्थानिक अधिकाऱ्याला ती गाडी आमदारांची होती हे माहित नव्हतं, अशी प्राथमिक माहिती जिल्हा निवडणूक आधिकाऱ्याकडून सांगण्यात आली आहे. संबंधित गाडी ही आमदाराच्या नावावर होती हे स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, जेव्हा ईव्हीएमची तपासणी करण्यात आली तेव्हा ते सील होते, अशी माहिती सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून या प्रकरणी 4 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी याचा व्हिडीओ ट्विट केला आहे.
पाहा ट्विट-
Every time there is an election videos of private vehicles caught transporting EVM’s show up. Unsurprisingly they have the following things in common:
1. The vehicles usually belong to BJP candidates or their associates. ….
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 2, 2021
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्रातील ‘हा’ साखर कारखाना रोहित पवारांच्या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मंजूर
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पुढील सात दिवस ‘या’ सेवा राहणार बंद
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलबाबत घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
चोरीनंतर झालं असं काही की… चोराला अत्यानंदानेच आला हृदयविकाराचा झटका
पुण्यात कोरोनाचा डेंजर प्रसार सुरु, पाहा गेल्या 7 दिवसांची धक्कादायक आकडेवारी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.