मुंबई | आमदार निधीत एक कोटी रुपयांची वाढ, वाहनचालकांना दरमहा 15 हजारांचं वेतन यापाठोपाठ आमदारांना वाहन खरेदीकरिता 30 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा करून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी आमदार मंडळींना खूश केलं.
भाजप सरकारच्या काळातच मुंबई, ठाणे, पुणे जिल्ह्य़ांच्या विकास निधीत कपात करण्यात आल्यानं विकासाचा प्रादेशिक असमतोल निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचं प्रत्युत्तरही त्यांनी विरोधकांना दिलं.
यंदाचा अर्थसंकल्प विदर्भ, मराठवाडय़ावर अन्याय करणारा, जिल्हा विकास आराखडय़ातील निधी कमी करणारा, तसेच या अर्थसंकल्पात संयुक्त महाराष्ट्र कुठेच दिसत नसल्याचा आरोप विरोधकांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत केला होता. मात्र अजित पवारांनी हे सर्व विरोधकांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले.
राज्यातील सर्व विभागांना आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही अर्थसंकल्पात केलं असलल्याचं पवार यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातम्या-
…अशा रितीने येस बँकेची घसरलेली गाडी पुन्हा रूळावर येणार!
अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनाही भारतीय संस्कृतीचा अंगीकार करावा लागला!
महत्वाच्या बातम्या-
खुशखबर… तर पेट्रोल 70 रूपयांपर्यंत खाली येणार!
आंबेडकरांच्या ग्रंथाचा दाखला देत ओबींसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; कोल्हेंची मागणी
मुलांच्या वार्षिक परीक्षांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
Comments are closed.