बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लस न घेतलेल्या आमदारांना विधानसभेत प्रवेश नाही’; बिहार विधानसभा अध्यक्षांचं फर्मान

पाटणा | बिहारमध्ये विधानसभेचे पावसाळी अधिवेशन काही दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोरोना लसीचा डोस न घेतलेल्या आमदारांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण फक्त कोरोना लसीचा डोस घेतलेल्या आमदारांना बिहार विधानसभेत प्रवेश दिला जाणार आहे.

विजय कुमार सिन्हा यांनी सर्व आमदारांना पावसाळी अधिवेशनापूर्वी सहकुटुंबीयांसमेवत कोरोनावरील लस घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच आपल्या मतदार संघातील लोकांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, आपण सावध आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. लस ही कोरोनाविरोधात सर्वोत्तम सुरक्षा कवच आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी असल्याने आपली जबाबदारी वाढते. लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्यकर्त्यांद्वारे जनतेला लस घेण्यासाठी प्रोत्साहित केल्यास समाजात सकारात्मक संदेश जाईल, असं विजय कुमार सिन्हा म्हणालेत.

दरम्यान, आमदारांच्या सौजन्याने त्यांच्या क्षेत्रातील 80 टक्के पेक्षा जास्त लोकांनी लस घेतल्या असतील त्यांचा विधानसभेद्वारे सन्मान केला जाईल, असं विजय कुमार सिन्हा म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

आंबिल ओढा परिसरातील नागरिक आणि पोलीसांमध्ये तुफान राडा; नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

“महाविकास आघाडी सरकार हे शिवशाही सरकार नसून बेबंदशाही सरकार”

“सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुख यांचा थेट संबंध नाही”

‘इंधन दरवाढीसाठी काँग्रेस जबाबदार’; पेट्रोलियम मंत्र्यांचा गंभीर आरोप

कडक सॅल्युट! बोट तुटलं तरीही ‘तो’ सामना खेळायला मैदानात उतरला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More