बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

MLC Election: देवेंद्र फडणवीसांना मिठी मारताच बावनकुळे यांना अश्रू अनावर

नागपूर | नागपूर विधान परिषद जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर (Nagpur Legislative Council Election Results) झाला आहे. हा निकाल भाजपच्या बाजूने लागला असून भाजपनं काॅंग्रेस दणदणीत विजय मिळवलाय.

विधान परिषदेच्या नागपूर जागेच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या होत्या. एकतर्फी विजय झाला असून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandra shekhar Bawankule)  हे विजयी झाले झाले आहेत. 362 मते घेऊन बावनकुळे विजयी झाले आहेत.

नागपूरमधील विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचं विरोधी पक्षनेते यांनी अभिनंदन केलं. फडणवीसांनी चंद्रशेर बावनकुळे यांनी हार घालताच त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांना पाहून फडणवीसांनीही त्यांना मिठी मारली. मिठी मारताच त्यांना गहीवरु आलं.

दरम्यान, मी स्वत: निवडून आलो त्यावेळी आनंद झाला त्यापेक्षाही आज बावनकुळेंच्या विजयानंतर जास्त आनंद झालाय, असं फडणवीसांनी म्हटलं. सध्या सगळीकडे जल्लोषाचं वातावरण असून भाजप सरकार विजयी झाल्यानं राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘रडीचा डाव खेळू नका, आता… ‘; चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला खुलं आव्हान

‘विनोदवीर नाना पटोलेंचं हास्यजत्रेपेक्षा मोठं हसं झालंय’; भाजपचा हल्लाबोल

“बावनकुळेंचा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक”

MLC Election Result | “नाना पटोले यांच्या हुकूमशाहीला जनतेनं जागा दाखवली”

“अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा पराभव, पटोलेंनी राजीनामा द्यावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More