बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्तास बंद

मुंबई | लसींच्या कमी पुरवठ्यामुळे राज्य सरकारने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात 45 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य द्यावं लागेल. म्हणूनच 18 ते 44 वयोगटाला तुर्त लस मिळणार नाही, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

कोरोनाविरोधातील लसीच्या तुटवड्यामुळे 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचं तूर्तास लसीकरण केलं जाणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली आहे.

45 वरील व्यक्तींना दुसरा डोस भारत सरकार देवू शकत नाही. त्यामुळं दुसरा डोस देणं गरजेचं आहे. असं असल्यानं महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली लस ही 45 वर्षांवरील लोकांना दिली जाणार आहे. दुसऱ्या डोससाठी 20 लाख डोस हवेत. सध्या केवळ 10 लाख आहेत, अशी माहिती राजेश टोपेंनी दिलीये.

महाराष्ट्रात 18-44 वयोगटातील लसीकरण आपण स्थगित करत आहोत. सीरमचे प्रमुख आदर पुनावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी 20 मे नंतर महाराष्ट्राला दर महिन्याला दीड कोटी डोसेस देऊ असं सांगितलंय. त्याची विगतवारी कशी करायची याबाबत ते लंडनहून भारतात आल्यावर निर्णय घेतील, असं राजेश टाेपेंनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या- 

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नितीन राऊत यांनी केली ही मोठी घोषणा

चिंताजनक! ‘या’ जिल्ह्यात ज्याची कोरोना टेस्ट होतेय तो पॉझिटिव्ह येतोय

भावाला Oxygen Cylinder न मिळाल्याने जवानाने केंद्रीय मंत्र्याला दिली जीवे मारण्याची धमकी!

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक

लाॅकडाऊनमध्ये नवदाम्पत्याची बुलेटवर सफर; पोलिसांनी पकडून केलं असं काही की… पाहा व्हिडीओ 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More