लाडक्या बहीणींनो ‘या’ दिवशी मिळणार जानेवारीचा हप्ता?, मोठी अपडेट समोर

MMLBY January Installment | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’बाबत एक महत्वाची बातमी आली आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली. जुलै महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. (MMLBY January Installment)

निवडणुकीपूर्वी महायुतीने पुन्हा सत्तेत आलो तर 1500 ऐवजी 2100 रुपये महिलांना देऊ, अशी घोषणा केली होती. महिलांना नुकताच डिसेंबरचा हप्ता देण्यात आला. आता 2100 रुपये कधी मिळणार, सरकार आपलं आश्वासन पूर्ण करणार का?, याबाबत बोललं जातंय. तसेच लाडक्या बहिणी आता जानेवारीच्या हप्त्याची देखील वाट बघत आहेत.

जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?

राज्य सरकारने डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम 24 डिसेंबरपासून वर्ग करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये महिलांना मिळेत का हे पाहावं लागणार आहे. अशातच महायुती सरकारमधील नेते आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलंय.

ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी स्वत:हून या योजनेतून नाव काढून घ्यावं. महिलांना आतापर्यंत जेवढी रक्कम देण्यात आली ती परत मागण्यात अर्थ नाही. आतापर्यंत जे दिलं ते महिलांना अर्पण केलं असं समजू मात्र ज्या महिला पात्र नाहीत त्यांनी, आपलं नाव काढून घ्यावं, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. (MMLBY January Installment)

2100 रुपये कधी मिळणार?

महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यास लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार असं सरकारने म्हटलं होतं. राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार होईल, असं म्हटलं होतं. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच आता 2100 रुपयांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आतापर्यंत डिसेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार 2 कोटी 52 लाख महिलांच्या खात्यात 1500 रुपये पाठवण्यात आले होते. आता, जानेवारी महिन्यातील रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. (MMLBY January Installment)

News Title –    MMLBY January Installment

महत्त्वाच्या बातम्या-

धनंजय मुंडेंवर अन्याय का? मविआच्या नेत्याचा सवाल

गुड न्यूज! सोने-चांदीत आली स्वताई, ‘इतक्या’ हजारांची झाली घसरण

महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची योजना, 26 जानेवारीला घोषणा होण्याची शक्यता

पत्नी, ड्रायव्हरच्या नावे कोटींचे फ्लॅट; वाल्मिक कराडची प्रॉपर्टी पाहून थक्क व्हाल

पैसे गुंतवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!