बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसे कार्यकर्ते नाराज?, म्हणाले…

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या (MNS) गुडीपाडवा मेळाव्यात बोलताना तुफान फटकेबाजी केली. राज ठाकरेंनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष्यांसह मशिदींवरील भोंग्यावरूनही सडकून टीका केली.

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेचा फटका मनसेलाच बसल्याची शक्यता आहे. मी माझ्या प्रभागामध्ये हनुमान चालिसा वाजवणारे भोंगे मशिदीसमोर लावणार नसल्याचं पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

राज ठाकरेंनी जो शब्द वापरला तो, ‘जर मशिदींवरील भोंगे काढले नाहीत तर…’,असा होता. मी स्टेजवर होतो. मी भाषण पूर्ण ऐकलं. मात्र, भोंगे कुणी काढायचे आहेत. सरकारने भोंगे काढायचे आहेत. सरकारने आधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं वसंत मोरे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.

दरम्यान, मी एक क्लिअर करतोय की माझी राज ठाकरेंवर किंवा पक्षावर कोणतीही नाराजी नाही. पण राजसाहेबांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळालंच नाही, असं वक्तव्य वसंत मोरे यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“तुम्ही भाजी जरी खरेदी केली तरी भाजप लगेच ईडीला कळवेल”

बुचामध्ये शेकडो मृतदेहांचा खच; ह्रदय पिळवटून टाकणारं दृश्य बघून झेलेन्स्की सुन्न

“मुख्यमंत्री महोदय, तुम्ही उद्या म्हणाल मी घराबाहेर पडत नाही तोपर्यंत…”

रशियन सैनिकांची विकृत मानसिकता; धक्कादायक माहिती समोर

दोन मुलांचा पिता असलेला ‘हा’ अभिनेता आहे रश्मिकाचा क्रश, नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More