मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक, गुजराती पाट्या हटवल्या!

मुंबई | मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. दादर आणि माहिम परिसरातील गुजराती पाट्या मनसेनं हटवल्या आहेत. 

दादरच्या पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स आणि माहिमच्या शोभा हॉटेलची पाटी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हटवली. 

दरम्यान, नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवरुन नाराजी व्यक्त केली होती. हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही, तसा कोणताही निर्णय झालेला नाही, असं सांगत राज ठाकरे यांनी हिंदी भाषेची जबरदस्ती कशापायी?, असा सवाल विचारला होता.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या