MNS | विधानसभा निवडणुका आता तोंडावर असताना मनसेला मोठा धक्का बसलाय. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच चित्रे यांनी मनसेवर गंभीर आरोप केले आहेत. (MNS )
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत (Trupti Sawant) यांना उमेदवारी देण्यात आल्याने चित्रे नाराज होते.अशात त्यांनी राज ठाकरे यांची साथ सोडत थेट शिवबंधन बांधलं आहे. ज्या विचारांसाठी तो पक्ष (मनसे )सुरू झाला होता ते विचार बाजूला ठेवून आता पक्ष चालत आहे. त्यामुळे मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचं चित्रे म्हणाले.
अखिल चित्रे ठाकरेंच्या शिवसेनेत
तसेच पुढे त्यांनी मनसे उमेदवार जिंकून आणण्यासाठी नाही, तर दुसऱ्याचा उमेदवार पाडण्यासाठी निवडणूक लढत आहे, असा आरोप देखील केला. राज ठाकरे बोलले होते की, मी दुसऱ्याचे लेकरं माझ्या अंगाखांद्यावर खेळवणार नाही, मग ज्या तृप्ती सावंत तीन-चार पक्ष बदलून आल्या. त्यांना लगेच उमेदवारी देण्यात आली, त्यांना ही उमेदवारी निवडून आणण्यासाठी नाही, तर दुसरे उमेदवार पाडण्यासाठी दिली गेली, असंही चित्रे म्हणाले.
अखेर मला पक्षाबाहेर ढकलण्यात त्यांना यश आलं… खंत एकंच की खंजीर समोरून नाही, मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला… राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा…. असो, जय महाराष्ट्र!
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) November 7, 2024
“तृप्ती सावंत जिंकण्यासाठी लढल्या असत्या तर मी त्यांच्यासोबत असतो. मात्र, कोणालातरी पाडण्यासाठी तुम्ही जर निवडणूक लढवत असाल तर ते अयोग्य आहे. वरुण सरदेसाई यांना जिंकून आणायची जबाबदारी आता माझी आहे. “, असं म्हणत अखिल चित्रे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. (MNS )
राज ठाकरे यांना दिला सल्ला
अखिल चित्रे यांनी एक ट्वीट करत राज ठाकरे यांना एक सल्ला देखील दिला आहे. “अखेर मला पक्षाबाहेर ढकलण्यात त्यांना यश आलं… खंत एकंच की खंजीर समोरून नाही, मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला…राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा….असो, जय महाराष्ट्र!”, असं ट्वीट चित्रे यांनी केलंय. (MNS )
News Title : MNS Akhil Chitre Joins Uddhav Thackeray Group
महत्वाच्या बातम्या –
रवि योगाचा शुभ संयोग ‘या’ 5 राशींना करणार धनवान, मिळणार पैसाच पैसा!
प्रमोद महाजनांच्या हत्येवरून पूनम महाजनांचं मोठं विधान!
18 वर्षांनंतर प्रमोद महाजनांच्या हत्येसंदर्भात खळबळजनक दावा समोर!
पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादीवर सडकून टीका!
उद्धव ठाकरेंचं शिंदे गटावर खोचक शब्दात टीकास्त्र!