मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आल होतं. मात्र उपचारांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय.
अमित ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल केलं होतं.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांच्या तातडीने चाचण्यात केल्या गेल्या होत्या. यामध्ये त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. अमित यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
अमित ठाकरे यांना वायरल ताप असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं होतं. अखेर उपचारांनंतर त्यांना डिस्चार्ज देऊन घऱी सोडण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…त्यात ‘डिसलाइक’ करण्यासारखं काहीच नव्हतं’; भाषणानंतर शिवसेनेचा मोदींना टोला
आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कधी मिळणार मदत?
…म्हणून सीबीआयला राज्यात ‘नो एन्ट्री’- किरीट सोमय्या
दिलासादायक! सलग तिसऱ्या दिवशी देशभरात 60 हजारांहून कमी रूग्णांची नोंद