काँग्रेसमध्ये खांदेपालट होताच हालचालींना वेग; थोरातांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच बाळासाहेब थोरात यांनी महाआघाडीचे संकेत दिले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे, वंचित आणि इतर समविचारी पक्षांना एकत्रित घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

गेल्या काही निवडणुकीत भाजप आणि शिवेसेना युतीच्या निमित्ताने लोकशाहीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत इतर पक्षांनी एकत्र यायला हवं, असं थोरात म्हणाले आहेत.

समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्हाला ज्यांच्याशी चर्चा करण्याची गरज पडेल त्यांच्याशी चर्चा करु असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-भारताची ‘सुवर्णकन्या’ हिमा दास; अ‌ॅथलेटिक्स स्पर्धेत रचला इतिहास

-स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्वीटची मुंबई पोलिसांनी घेतली दखल

-…म्हणून युवराजला संघाबाहेर काढलं; युवराज सिंहच्या वडिलांचा गंभीर आरोप

-मामा-भाचे काँग्रेसला तारणार का???

-शिवसेनेच्या बॅनरवर आता फक्त ठाकरे…

Loading...