महाराष्ट्र मुंबई

“आभाळ जरी कोसळलं तरी…, महाराष्ट्रा काळजी घे”

मुंबई | वादळामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं असून, सुदैवानं कुठेही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. निसर्गच्या निमित्तानं आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मनसेनं राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मनसेनं राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं. कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी. महाराष्ट्रा, काळजी घे असं ट्विट मनसेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीही नागरिकांना आवाहन केलं होतं. त्यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. एक जबाबदार नागरिक म्हणून या संकटकाळात आपल्याला जे काही मदतकार्य करणं शक्य असेल ते आपण करायला हवं, असं अमित ठाकरे म्हणाले होते.

दरम्यान, या चक्रीवादळाच्या अतिवेगवान वाऱ्यामुळे गरीब आणि बेघर लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. फक्त माणसांनाच नव्हे तर रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांनाही त्याचा फटका बसणार आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

‘या’ दोन माजी आमदारांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पुढील सहा तासांत चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार- हवामान विभाग

महत्वाच्या बातम्या-

चक्रीवादळाचं केंद्र मुंबई राहिलं नाही, तरीही पुढील 2-3 तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातल्याने गर्भार हत्तीणीचा मृत्यू

“आप्पा… तुम्ही अंगीकारलेला लोकसेवेचा वसा मी पुढे सुरू ठेवणार हा माझा शब्द”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या