बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धवजी, हिंमत करा आणि टोमण्या पलीकडची कृती आज कराच”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तीन जाहीर सभा घेत मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. गुढीपाडवा मेळावा, उत्तर सभा आणि औरंगाबादेतील सभेतही राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला.

राज ठाकरेंच्या सभेनंतर राज्यात गदारोळ सुरू असताना आता शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज संध्याकाळी सभा घेत आहेत. राज्यातील एकंदर घडामोडी बघता सर्वांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेकडे लागलं आहे. उद्धव ठाकरे आज काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना असताना सभेपूर्वी मनसेकडून (MNS) उद्धव ठाकरेंना आवाहन करण्यात आलं आहे.

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी उद्धव ठाकरेंना आवाहन केलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा दबाव झुगारण्याची हिम्मत करा. टोमण्यापलीकडची आज कृती कराच, असं आवाहन गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंना केलं आहे.

दरम्यान, उद्धवजी आपणास आवाहन आहे की आदरणीय बाळासाहेब यांचं स्वप्न पूर्ण करा. मशिदींवरील भोंगे आणि रस्त्यावरील नमाज आम्ही बंद करू अशी घोषणा आज कराच, असं देखील गजानन काळे म्हणाले आहेत. काळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना आवाहन केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या दरावर काय परिणाम झाले

मोठी बातमी! केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या, शरद पवारांवरील टीका अंगलट

‘हरामखोर विकृती, मनोरूग्ण तुला चपलेने मारून…’; पवारांवरील आक्षेपार्ह टीकेनंतर रूपाली ठोंबरे आक्रमक

‘तू तर लबाडांचा लबाड…’; अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांवर टीका, वादग्रस्त पोस्ट चर्चेत

27 मे रोजी ‘या’ भागात मान्सूनचं आगमन, हवामान खात्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More