Top News मुंबई

महाराष्ट्र सरकार ह्या घुसखोरांना केव्हा हुसकावणार?; मनसेचा सवाल

मुंबई | बांग्लादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारताचं नागरिकत्व मिळवून देणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केलीये. त्यांच्याकडून राज्यातील एमआयएमच्या दोन आमदारांची स्वाक्षरी असलेलं लेटरहेड्स जप्त करण्यात आलीयेत. यानंतर मनसेने राज्य सरकारला जाब विचारला आहे.

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन बांग्लादेशी घुसखोरांना कधी हाकलणार, असा सवाल मनसेने राज्य सरकारला विचारला आहे.

“महाराष्ट्रात बांग्लादेशियांचे जे अड्डे-मोहल्ले उभे राहत आहेत तेच भविष्यात त्रासदायक ठरणार; हे राजसाहेब वारंवार सांगत आहेत. त्यासाठी आम्ही मुंबईत महामोर्चाही काढला होता. आता ह्या घुसखोरीला धर्मांधतेसह, राजकीय पाठबळही लाभतंय. महाराष्ट्र सरकार ह्या घुसखोरांना केव्हा हुसकावणार?”, असं मनसेच्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलंय.

घुसखोरांच्या मुद्द्यावर यापूर्वी देखील मनसेने आक्रमक पवित्रा हाती घेतला होता. बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध आपली भूमिका मांडताना एनआरसी कायद्याचं समर्थन केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

‘सतर्कतेने दिवाळीचं स्वागत करा’; इकबाल सिंह चहल यांचं मुंबईकरांना आवाहन

“बिहारच्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन”

…तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील

‘आता तुम्हीच मार्ग काढा’; मराठा आंदोलक शरद पवारांची घेणार भेट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या