‘एक हाती सत्ता द्या’ म्हणणाऱ्या मनसेने अद्याप भोपळाही फोडला नाही?

MNS Assembly Results 2024 

MNS Assembly Results | आज 23 नोव्हेंबररोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. यात महायुतीने शतक गाठले आहे. महायुती तब्बल 167 जागांवर आघाडीवर दिसून येत आहे. तर, महाविकास आघाडी 83 जागांवर आघाडीवर आहे. यात राज ठाकरे यांचा पक्ष असलेला मनसे कुठेच दिसून येत नाही. (MNS Assembly Results )

सध्या मनसेने एकाही जागेवर आघाडी घेतली नसल्याचं चित्र दिसून येत आहे. एक्झिट पोलमध्ये देखील मनसेबाबत निराशा करणारे आकडे समोर आले होते. पोल्समध्ये मनसेला फक्त 2 टे 4 जागा पडणार, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

मनसेची आघाडी की पिछाडी?

या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे हे माहीममधून आघाडीवर दिसून येत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात 49 सभा घेतल्या होत्या. (MNS Assembly Results )

मनसेने 130 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे केले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला अनुकूल वातावरण असं दिसत होतं. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अशी स्थिती दिसत नाहीये. मतमोजणी सुरु होऊन आता आता दोन तास झाले तरीही मनसेचा उमेदवार एकाही जागेवर आघाडीवर नाहीय.

सुरुवातीला माहीम विधानसभा मतदारसंघात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी आघाडी घेतली होती. पण आता ते पिछाडीवर आहेत. आता मनसेला किती जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. (MNS Assembly Results )

News Title :  MNS Assembly Results 2024 

महत्वाच्या बातम्या –

निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच?, ‘हा’ नेता म्हणाला मुख्यमंत्री आमचाच

‘राज’पुत्र अमित ठाकरे आघाडीवर की पिछाडीवर?, माहीमचा निकाल पाहण्यासाठी ‘इथे’ क्लिक करा

परळीत धनंजय मुंडे जोमात, तब्बल ‘इतक्या’ हजार मतांनी घेतली आघाडी!

विधानसभा LIVE अपडेट्स! पाहा कोण किती मतांनी आघाडीवर

राजकारणातील मोठ्या कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला; ‘या’ नेत्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .