Top News मनोरंजन राजकारण

सुशांत आत्महत्या प्रकरणात मनसेचा आदित्य ठाकरेंना पाठिंबा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षाकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. आदित्य ठाकरेंवर भाजप नेते नारायण राणे यांनी टीका केली आहे. मात्र, या प्रकरणानंतर मनसेने आदित्य ठाकरे यांची पाठराखण केलीये.

याप्रकरणाबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिलीये. “ठाकरे परिवाराच्या एखाद्या सदस्याकडून अशाप्रकारची गोष्ट झाली असेल असं वाटत नाही. भाजपच्या या आरोपांमुळेच हा वाद सुरु झालाय.”

यासंदर्भात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिलीये. “सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव कुठेही आलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयात वकील कुणाचंही नाव घेऊ शकतात. मोठ्या लोकांची नावं घेतल्याशिवाय त्या प्रकरणाला प्रसिद्धी मिळत नाही, हे आता अलिकडच्या काळात समीकरण निर्माण झालंय.

आदित्य ठाकरेंवर आरोप झाल्यानंतर त्यांनी देखील यावर भाष्य केलं होतं. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येतेय. मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही.” असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या हत्येत स्टन गनचा वापर; अमेरिकेतील डॉक्टरांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक

सगळे पूल भक्कम, आमच्या सरकारला धोका नाही- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या