बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसेने करून दाखवलं! आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात फोडली दहीहंडी; पाहा व्हिडीओ

मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. सार्वजनिक सण व उत्सव यांच्यावर सुद्धा बंदी आहे. एकीकडे मंदिरं बंद असताना मंदिरं उघडण्याची मागणी केली जात होती. तर दुसरीकडे उत्सवांवर देखील निर्बंध लावण्यात आल्यानं मनसे आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता मनसेने सरकारच्या आदेशांना न जुमानता दहीहंडी फोडून दाखवली आहे.

श्रीकृष्ण जन्माष्ठमी असल्यानं राज्यभर दहिहंडी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पण सरकारने बंदी आणल्यामुळे विरोधकांनी दहीहंडी साजरी करण्याचा घाट घातला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेऊन ठाणे, रत्नागिरी, मुंबई या भागात दहीहंडी फोडली. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

राज्याचे पर्यटनमंत्री व वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातचं मनसेने शासनाचा नियम मोडला आणि दहीहंडी उत्सव साजरा केला. प्रशासनाच्या विरोधाला न जुमानता दहीहंडी साजरी करण्य़ात आली आहे. परिणामी महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांच्या मतदारसंघातचं नियम मोडण्यात आल्यानं आता मनसेच्या धाडलाचं कौतूक होताना दिसत आहे.

दरम्यान, वरळी मतदारसंघात दहीहंडी साजरी करताना मनसेने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आहे. कोण म्हणत होणार नाही? साजरी केल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा मनसेने सरकारला दिला आहे. अखेर मनसेने करून दाखवलं, असा थेट संदेश त्यांंनी ठाकरे सरकार दिला आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्राला दिलासा देणारं चित्र; 24 तासात ‘या’ 6 जिल्ह्यात एकही कोरोना रूग्ण नाही!

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयावर जंयत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

राज्यात दोन दिवसांच्या वाढीनंतर पुन्हा कोरोना रूग्णसंख्येत घट; वाचा आजची आकडेवारी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधी मुंबईची आकडेवारी कमी आधिक प्रमाणात, वाचा आजची आकडेवारी!

प्रो-कबड्डीमधील सिद्धार्थ देसाई झाला मालामाल, लागली इतक्या कोटींची बोली!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More