मुंबई | इंडियन प्रीमिअर लीगच्या 15 व्या पर्वाला 26 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्या लढतीने सुरूवात होणार आहे.
आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंची ने-आण करण्यासाठी बसेसचा वापर केला जातो. पण या बसेस महाराष्ट्राच्या बाहेरुन आणल्या जातात. राज्यातील बसेस वाहतूकदारांना हे काम दिलं जात नाही.
स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम देण्याची मागणी मनसेने या आधीपासूनच लावून धरली होती.
बसवर ‘मनसेचा दणका’ असं लिहिलेलं पोस्टर चिकटवून मनसेने बसची तोडफोड केली. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
मनसेच्या मागणीला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी ‘खळ्ळ खट्यॅक’चा वापर केल्याचं दिसत आहे. मंगळवारी रात्री ताज हॉटेलबाहेर मनसे वाहतूक सेनेच्या सदस्यांनी महाराष्ट्राच्या बाहेरुन आलेल्या बसेस फोडत याचा निषेध व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
तळीरामांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान नाटोने दिलेल्या गंभीर इशाऱ्याने जगाचं टेन्शन वाढलं
“माझ्यासारख्या कलाकारांना…”, अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने सांगितले मराठी इंडस्ट्रीतले धक्कादायक अनुभव
“महाविकास आघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए”
‘कच्चा बादाम’ गाण्यावर चिमुकलीचा क्यूट डान्स व्हायरल; तुम्ही पाहिला का व्हिडीओ?
Comments are closed.