बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘निलेश लंके ही लढाई आपण सुरु केली पण…’; निलेश लंकेंच्या नोटीसला मनसेचं आव्हान

मुंबई | बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्याला 1 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. निलेश लंके यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत निलेशन लंके यांना थेट आव्हान दिलं आहे.

अब्रुनुकसानीची नोटीस आहे, की खंडणीसाठीचं पत्र, असा सवाल उपस्थित करत आपल्या या बेकायदेशीर नोटीसला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे. तसेच निलेश लंके ही लढाई आपण सुरु केली, पण ही लढाई आम्हीच संपवणार हे निश्चित, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे.

अब्रुनुकसानीची 1 कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर मनसे पदाधिकारी अविनाश पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच मदतीसाठी आवाहन केलं आहे. त्यासोबतच निलेश लंकेंनीच फोनकरुन मला आणि पक्षाला शिवीगाळ केल्याचा आरोपही अविनाश पवार यांनी केला आहे.

दरम्यान, नोटीसमध्ये अविनाश पवार यांच्याकडे बदनामी पोटी 1 कोटी रुपये आणि नोटीस खर्च 5 हजार असे एकूण 1 कोटी 5 हजार रुपये देऊन माफी मागण्याची मागणी केली आहे. लंके यांनी 1 कोटी 5 हजार रुपये देऊन लेखी माफी मागण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

प्रियकराने खेळला खुनी डाव! प्रेयसी माहेरी येत असताना धक्कादायक प्रकारे केला कहानीचा शेवट

दिलासादायक! महाराष्ट्रातील आजच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा एका क्लिकवर

‘ज्या दिवशी बारामतीच्या लोकांना…’; संसदेची पायरी चढण्याअगोदर बाबांनी ‘या’ दोन गोष्टी सांगितल्या

एकीकडे महाराष्ट्र लॉकडाऊनमधून बाहेर पडत असताना ‘हा’ जिल्हा मात्र 7 दिवस कडकडीत बंद

सकारात्मक बातमी! मुंबईत आज नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 9 पटीने अधिक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More