मुंबई | दिल्लीतल्या मरकजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली. मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा काही कारस्थान वाटत असेल तर यांना जगवायचं कशाला?,असा सवाल करत मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे, असं राजठाकरे म्हणाले.
भाज्यांवर थुंकणारे, नर्ससमोर नग्न होणारे यासारख्यांना फोडून काढलं पाहिजे. त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले पाहिजेत. लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, असा इशारा देत आक्षेपार्ह वागणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे, असं ते म्हणाले.
निवडणुकावेळी अमुक तमुक पक्षाला मतदान करा, असं आवाहन करणारे मुल्ला मौलवी आहेत कुठे? त्यांनी समजवायला नको का मुस्लिम समाजाल. नुसतं सुशिक्षित असून चालत नाही. सुज्ञ असायला हवं, असं ते म्हणाले.
तसंच पोलिसांवर हात उचलण्याची यांची हिम्मत कशी होते? यांचे हात कलम करा. आपल्यासाठीच तर डॉक्टर जीवाचं रान करत आहेत ना? कळायला नको या लोकांना, अशा शब्दात राज ठाकरेंन आपला संताप व्यक्त केला.
ट्रेंडिंग बातम्या-
मुंबई विमानतळावर तैनात CISF चे 11 जवान कोरोना पॉझिटिव्ह
तब्लिगीमुळे 14 राज्य व्हेंटिलेटरवर; तब्बल 647 जणांना कोरोनाची लागण
महत्वाच्या बातम्या-
देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर असल्या लोकांना गोळ्या घालायला पाहिजेत- राज ठाकरे
देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर असल्या लोकांना गोळ्या घालायला पाहिजेत- राज ठाकरे
कोरोनामुळे जगातील सर्वांत मोठी आर्थिक मंदी; आयएफएमचं जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं भाकित
Comments are closed.