मुंबई | महाराष्ट्रासह जगभरात आज मराठी भाषा दिन साजरा होत आहे. विविध स्तरांतील मान्यवर सोशल मीडियावरून मराठी दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं एका काश्मिरी तरुणीने गायलं आहे. त्या गाण्याचा व्हिडीओ राज ठाकरेंनी शेयर केला आहे.
राज ठाकरेंनी व्हिडीओ शेअर करत, आपल्या राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो, अशा शब्दात राज यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये काश्मिरी वाद्यांसह ती गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘रुणुझुणु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा,’ हे गाणं गात आहे. या तरूणीचं नाव शमीम अख्तर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, आज सर्व राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त शाळांमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
ट्रेंडिंग बातम्या-
आपला पॅटर्नच वेगळा; सलमान खान करणार ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक!
धक्कादायक! आप नेत्याच्या घरावर सापडले पेट्रोल बाॅम्ब, गावठी कट्टे, दगडांचा साठा
महत्वाच्या बातम्या-
- दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…
- सदस्यांतून सरपंच निवडीचा मार्ग मोकळा; विधानसभेत विधेयक मंजूर
- “बाळासाहेबांचे वंशज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतील का?”
Comments are closed.