बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘योगी आदित्यनाथ, मग तुम्हीही लक्षात ठेवा…’; राज ठाकरे यांचा थेट इशारा

मुंबई | महाराष्ट्राची परवानगी घेतल्याशिवाय उत्तर प्रदेशातील कामगारांना आत येता येणार नाही, हे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशातील मजुरांना काम द्यायचं असल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल, असं योगी म्हणाले होते.

उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील, तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल, असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल, तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हेही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य सरकारनेही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे. तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा, हा कटाक्ष महाराष्ट्राने पाळावा, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला केली आहे.

राज्य स्थलांतरित कायद्या’खाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ती वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे. कारण आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो, असं राज ठाकरे म्हणाले.

 

ट्रेडिंग बातम्या-

लग्नाचं आमिष दाखवून ठेवलेले लैंगिक संबंध बलात्कार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सूचना केल्यावर राजकारण समजत असाल तर तुम्ही गैरसमजात रहा; फडणवीसांचं उद्धव यांना प्रत्युत्तर

महत्वाच्या बातम्या-

दीपिका रणवीरचं लॉकडाऊन… पाहा दीपिकाचा रोमँटिक अंदाजातला व्हीडिओ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागितली केरळ सरकारकडे ‘ही’ महत्त्वाची मदत

कामगारांच्या मदतीला अभिनेत्री माधुरी दिक्षीत धावली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More