Top News महाराष्ट्र मुंबई

“अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग'”

मुंबई |  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये येणार आहेत. या भेटीमध्ये ते बॉलिवूड कलाकार आणि मोठ्या उद्योजकांना भेटणार आहेत. त्यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली आहे. अशातच योगींच्या या दौऱ्यावर मनसेने खोचक अशी टीका केली आहे.

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला “ठग”, अशा शब्दात मनसेने योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. योगी ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या हॉटेलबाहेर मनसेने पोस्टर लावला आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’, असं पोस्टरमध्ये म्हटलं आहे. मनसेने यामध्ये अप्रत्यक्षपणे योगींना ठग असं संबोधलं आहे.

दरम्यान, कहा राजा भोज…और कहा गंगू तेली…”कुठे महाराष्ट्रचं वैभव”….तर कुठे युपीचं दारिद्र्य असंही मनसेने या पोस्टरमध्ये म्हटलं आहे. यावर महाराष्ट्र भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचंं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजप खासदार आणि अभिनेते सनी देओल यांना कोरोनाची लागण

“बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांची हिंदुत्वाची पोपटपंची हा विनोदच”

टेनिस व्हॉलिबॉल महासंघाच्या मुख्य कार्यकारिणीची निवड, सीईओपदी डॉ. व्यंकटेश वांगवाड!

आज तिसरा वनडे! व्हाईटवॉश टाळण्यासाठी कोहली अँड कंपनीला अखेरची संधी

‘2021 मध्ये सर्वांना कोरोनाची लस मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे…’; रामदेव बाबांचा नागरिकांना मोलाचा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या