Top News महाराष्ट्र मुंबई

“मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं काय झालं?”

मुंबई | कोरोनाच्या काळातील वीजबिलाचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. याच पार्श्वभूमीवर वीजबिलाच्या प्रश्नावरून मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवास्थानासमोर बॅनर लावत सरकारवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता नवीन वर्ष आलं. गोड बातमी तर राहिली दूर पण जनतेचे हालचं हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तरी वीज बिल भरा, ऊर्जा मंत्री म्हणाले. मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं.?, अशा आशयाचं बॅनर लावण्यात आलं आहे.

बॅनरमध्ये मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. मनसेने नव्या वर्षाच्या सुरूवातीला ठाकरे सरकारला वीजबिलाच्या मुद्याची आठवण करून दिली आहे. विरोधी पक्षानेही हिवाळी अधिवेशनात सरकारवर वीजबिलावरून टीका केली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘एकच वादा अजितदादा’ vs ‘पुण्याची ताकद गिरीष बापट’, भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

‘काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का?’; बाळासाहेब थोरात म्हणाले….

“विचार करा कोरोना काळात पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर?”

‘कबीर सिंग’मधील मराठमोळ्या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोनं खळबळ

कोरेगाव भीमा इतिहासाबाबत रामदास आठवलेंची नवी मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या