बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दारुची दुकानं सुरु केली मग मंदिरही खुली करा’; मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

पुणे | पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दारुची दुकानं सुरु केली, मग आता मंदिरही खुली करा अशी मागणी केली आहे. याबाबत अज शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित मागणी केली आहे.

महाराष्ट्रात सध्या सर्वच गोष्टींना सुरुवात झाली आहे. सर्व प्रकारची दुकानं सुरु झाली आहेत. दारुची दुकानं तर 2 ते 5 किलोमीटरच्या रांगा लावून सुरु आहेत. सगळं असं सुखदायक चित्र आहे. या सर्व गोष्टी सुरु असून कोरोनाचा प्रसार होत नाही. बऱ्यापैकी जनताच कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेत आहे. त्यामुळे आता योग्य त्या नियम अटी घालून राज्यातील मंदिरही मुक्त केली पाहिजे, असं अजय शिंदे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

सरकारने आपल्या या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घ्यावं, असंही अजय शिंदे यांनी या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे मनसेच्या या पत्रानंतर आता राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, देशभरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होईल अशी सर्व ठिकाणं बंद करण्यात आली आहेत. यात अगदी सर्व धार्मिक स्थळांपासून पर्यटन स्थळांचाही समावेश आहे. मात्र, आता सरकारने दारु दुकानं सुरु केल्यानं इतर गोष्टी सुरु करण्यासाठी मागण्या होताना दिसत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कसाबच्या साक्षीदाराचा उपचारखर्च भाजप उचलणार; फडणवीसांकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

“चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र विलंब का करतोय?”

महत्वाच्या बातम्या-

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

सॅमसंगने ‘ती’ ऑफर 17 मेपर्यंत वाढवली; एसी, फ्रिज-टीव्हीवर मिळणार कॅशबॅक

राजेश राठोड की राजकिशोर मोदी? काँग्रेसचा उमेदवार कोण?

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More