महाराष्ट्र मुंबई

“बाळासाहेबांचा पुतळा उभारलात, आता आनंद दिघेंचाही उभारा”

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे ठाण्यात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारला जावा, अशी मागणी मनसेनं केली आहे.

या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेत त्यांच्याकडे निवेदन सादर केलंय. ठाणे शहराचा केंद्रबिंदू असलेल्या चिंतामणी चौकात आनंद दिघे यांचा हा पुतळा उभारण्यात यावा, असं या निवेदनात म्हटलं आहे.

ठाणे शहराच्या विकासासाठी केलेल्या अविश्रांत कामासाठी संपुर्ण ठाणे शहर दिघे साहेबांना विसरु शकत नाही, असं मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितलं आहे.

ठाणे-पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांकडून ही मागणी करण्यात आली. त्यामुळे आता यावर ठाणे महानगरपालिका काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही”

शेतकऱ्याच्या मुलीचा 24 तास लावणी करुन नवा रेकाॅर्ड; जन्मदात्यांसह उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू

“दिल्लीतील हिंसाचाराला अमित शहा जबाबदार, त्यांचा राजीनामा घ्या”

“मुस्लीम प्रशासकांच्या काळातील सर्व अपवित्र नावं आम्ही बदलणार”

विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाचा दणका; पाहा काय आहे प्रकरण…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या