Top News महाराष्ट्र मुंबई

मोदींवर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मनसेनेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी राज्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य पोलीस महासंचालकांकडे केली आहे. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्याआधी मोदींनी जनतेला खूप सारी आश्वासनं दिली होती. ती अद्यपही पूर्ण झालेली नाहीत, असं काळे यांचं म्हणणं आहे.

देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी 2 कोटी रोजगार उपलब्ध करुन देऊ, देशातील प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करु, पेट्रोल-डिझेल दर कमी करु शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु, अशी आश्वासनं मोदींनी दिली होती, असं काळे यांनी निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, मोदींवर कलम 420 अंतर्गत देशातील जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काळे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलला फिल्ममेकर्सचा तुफान प्रतिसाद

राहुल गांधींचं ममतांना समर्थन तर काँग्रेस खासदार म्हणतात मुख्यमंत्री नाटक करतात

सरदार पटेलांनी ‘RSS’ विरुद्ध केलेल्या कारवाईची सत्तरी; तरुणांकडून इतिहासाची उजळणी

मी जगातील सर्वात अभिमानी पती- रणवीर सिंग

मुख्यमंत्र्यांना ट्रेंडिंगमध्ये आणण्यासाठी आलेल्या काजल, रिया, श्रेया, भावना ट्रोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या